मी, [तुमचे नाव], [ॲप/असिस्टंटचे नाव] यांना माझी वैयक्तिक आरोग्य माहिती गोळा करण्याची, संग्रहित करण्याची आणि वापरण्याची संमती देत आहे, जेणेकरून ते मला त्यांच्या चॅट असिस्टंट/ॲपवर माझ्या गरजेनुसार वैद्यकीय मदत देऊ शकतील.
आरोग्य माहितीमध्ये खालील गोष्टींचा समावेश असू शकतो:
असिस्टंट/ॲपवर शेअर केलेली इतर माहिती
मला याची जाणीव आहे की, भारताच्या नवीन डेटा संरक्षण कायद्यानुसार ही आरोग्य माहिती 'संवेदनशील वैयक्तिक माहिती' आहे.
जर माझा विचार बदलला, तर मी [ॲप/असिस्टंटचे नाव] यांच्या संमती मागे घेण्याच्या प्रक्रियेचे पालन करून ही संमती नंतर मागे घेऊ शकेन.
[ॲप/असिस्टंटचे नाव] यांनी ही माहिती त्यांच्या चॅट असिस्टंट ॲपवर गोळा करण्याला आणि वापरण्याला माझी संमती आहे. याबद्दल [ॲप/असिस्टंटचे नाव] यांनी त्यांच्या [तारीख] पासूनच्या गोपनीयता धोरणात (Privacy Policy) स्पष्टीकरण दिले आहे. ही संमती, मी स्वाक्षरी (sign) केल्याच्या तारखेपासून [संख्या] वर्षासाठी वैध असेल.
मी [ॲप/असिस्टंटचे नाव] यांच्याकडे असलेली माझी आरोग्य माहिती तपासू शकेन, ती चुकीची असल्यास दुरुस्त करू शकेन, आणि गरज नसल्यास ती माहिती हटवण्यास (delete) सांगू शकेन. [ॲप/असिस्टंटचे नाव] माझी आरोग्य माहिती सुरक्षित ठेवतील.
ते परवानगीशिवाय इतरांना ती पाहू किंवा वापरू देणार नाहीत, आणि माहिती हरवण्यापासून किंवा नष्ट होण्यापासून तिचे संरक्षण करतील.
मला काही समस्या असल्यास, मी भारतीय डेटा संरक्षण मंडळाकडे (Data Protection Board of India) तक्रार करू शकेन.
स्वाक्षरी करून, मी हे मान्य करतो/करते की [ॲप/असिस्टंटचे नाव] माझी आरोग्य माहिती गोळा करू शकतात आणि वापरू शकतात. मी त्यांचे गोपनीयता धोरण (Privacy Policy) वाचले आहे.